Deputy Conservator of Forests – Roha
अधिकारी यांचे नांव व पद | कार्यालयाचा पत्ता | इ मेल |
श्री. शैलेंद्रकुमार जाधव, (भा.व.से.) उप वनसंरक्षक , रोहा | वन भवन, रोहा चणेरा रोड,ता.रोहा जि. रायगड, पिन 402 109 | dycfroha@mahaforest.gov.in |
श्री. रोहित चोबे सहाय्यक वनसंरक्षक, रोहा | वन भवन, रोहा चणेरा रोड,ता.रोहा जि. रायगड, पिन 402 109 | dycfroha@mahaforest.gov.in |
श्री. विकास भामरे, वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन, रोहा | वन भवन, रोहा चणेरा रोड,ता.रोहा जि. रायगड, पिन 402 109 | dycfroha@mahaforest.gov.in |
श्री.मनोज वाघमारे , वनक्षेत्रपाल रोहा | बंगले आळी, जुने पोलीस स्टेशन, पो.ता. रोहा जि. रायगड पिन 402 109 | rforoha1@gmail.com |
श्री.मनोज वाघमारे, वनक्षेत्रपाल मुरुड (अति. कार्यभार) | दरबार रोड मुरुड जंजिरा तहसिल मुरुड कार्यालयाच्या बाजुला, ता. मुरुड, जि. रायगड पिन 402 401 | rfomurud4@gmail.com |
श्री.प्रशांत शिंदे, वनक्षेत्रपाल माणगांव | अमित कॉम्प्लेक्सच्या समोर मु.पो.ता. माणगांव, जि. रायगड पिन 402 104 | rfomangaon2@gmail.com |
श्री.राकेश साहू, वनक्षेत्रपाल महाड | शासकीय गोडावूनचे मागे, नवेनगर, मु.पो.ता. महाड 402 301 | rfomahad3@gmail.com |
श्री. संजय पांढरकामे, वनक्षेत्रपाल म्हसळा | केशवराव खांबाटे सार्वजनिक वाचनालया समोर फॉरेस्ट कॉलनी, मु.पो.ता. म्हसळा, जि. रायगड पिन 402 105 | rfomhasala5@gmail.com |
श्री.स्वप्नील चंबुले , वनक्षेत्रपाल श्रीवर्धन | नवी पेठ रोड, मु.पो.ता. श्रीवर्धन, जि. रायगड 402 110 | rfoshriwardhan66@gmail.com |
ठाणे वृत्तातील रायगड जिल्ह्याचे दक्षिणे कडील रोहा, माणगांव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन व मुरूड या आठ तालुक्याचा समावेश रोहा वनविभागाचे कार्यक्षेत्रात होतो. सदरचे क्षेत्र पश्चिम घाट क्षेत्रात येत असून ते जैवविविधतेने समृध्द आहे. वनविभागाच्या उत्तरेला रायगड जिल्ह्यातील अलिबाग वनविभागाचे क्षेत्र, पुर्वे ला पुणे व सातारा जिल्ह्यातील अनुक्रमे भोर स्वतंत्र उपवनविभाग व सातारा वनविभागाचे क्षेत्र असून दक्षिणेला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण यास्वतंत्र उपवन विभागाचे क्षेत्र आहे. पश्चिमेला 73 कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. संपुर्ण क्षेत्र डोंगराळ व दुर्गम आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे वनक्षेत्राची विभागणी दोन गटात झाली आहे. डोंगराळ भागाची समुद्र सपाटी पासून सरासरी उंची 610 मी. आहे.
रोहा वनविभागाचे कार्यक्षेत्रातून, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गक्र.17 (82 कि.मी. लांब ) व कोंकणरेल्वे (84 कि.मी. लांब भिसे खिंडता. रोहा ते विन्हेरे ता. महाड) जातआहे. कोंकण रेल्वचे कोलाड स्टेशनपासून रो-रो सेवांअतर्गत अवजड वाहनांची वाहतूक केली जाते.
रोहा वनविभागाचे क्षेत्र170 50’ते 180 35’ उत्तर या अक्षांशावर आणि 720 50’ते 730 38’ या रेखांशावर विस्तारलेले आहे. या वन विभागामध्ये एकूण 895 महसूली गांवे (1991 चे सेन्सस प्रमाणे ) आहेत. त्यापैकी वनक्षेत्र असलेल्या गावांची संख्या 592 असून, या विभागाचे भौगौलिक क्षेत्र 3444.31 चौ. कि.मी. आहे. रोहा वन विभागातील वनक्षेत्राबाबत दि. 31/03/2024 रोजीचा तपशील खालील प्रमाणे आहे.
राखीव वन |
संरक्षित वन |
अवर्गिकृत वन |
संपादित वन |
पर्यायी वन |
एकूण वनक्षेत्र |
378.215 |
42.00 |
122.697 |
42.665 |
14.843 |
600.420 |