बंद

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे

 • अलिबाग समुद्रकिनारा :

  हा मुख्य समुद्रकिनारा आहे. सपाट आणि लांबी हे या समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ठ. आठवड्याच्या शेवठी पर्यटक इथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात. समुद्रकिनारा वाळू थोडी काळसर आणि पांढरी आहे. समुद्रकिनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर कुलाबा नावाचा किल्ला दिमाखात उभा आहे. या किल्यावर जाण्यासाठी फेरी सेवा देखील उपलब्ध आहे तसेच जर, ओहोटी वेळ असेल तर आपण पायी सुद्धा जावू शकतो. समुद्रकिनाऱ्यावरील सर्व मजेदार वॉटर  स्पोर्ट पण अनुभवू शकता.

 • काशीद समुद्रकिनारा :

  अलिबाग-मुरुड महामार्गावरील अलिबागपासून ५०  कि.मी. अंतरावर आहे, तसेच या समुद्रकिनार्यामध्ये शक्यतो ‘पांढरऱ्या वाळूच्या’ क्षेत्रामध्ये सर्वात स्वच्छ व सर्वात सुंदर किनारा आहे. सुमारे रू.१,५०० ते रू. २०,००० पर्यंत अनेक कॉटेज आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील सर्व मजेदार वॉटर स्पोर्ट पण अनुभवू शकता. इथे छोठे-छोठे खाद्य पदार्थाचे स्टॉल आहेत.

 • मांडवा समुद्रकिनारा :

  मांडवा अलिबागच्या उत्तरेस १०-१५ मैल आणि मुंबई गेट वे इंडिया पासून जवळचे असे सुंदर, अखंडित समुद्रकिनारा आहे. मांडवा हे अप्रतिम आणि प्रेक्षणीय समुद्रकिनार्याचे ठिकाण आहे. जेव्हा आकाश निरभ्र असते तेव्हा मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंतचे अविस्मरणीय दृश्य पाहायला मिळते. मांडवा गाव हे स्वत: नारळाच्या बागांनी सुशोभित असे ठीकाण आहे. 

 • किहिम समुद्रकिनारा :

  किहिमचा समुद्रकिनारी सर्व निसर्ग प्रेमीसाठी खूप काही पाहण्यासारखे आहे, जसे जंगली फुले आणि दुर्मिळ फुलपाखरे आणि पक्षी. अवश्य पाहावा असा कुलाबा किल्ला किनार्यापासून फर्लांग अंतरावर आहे. अलिबागपासून सुमारे १५ किमी अंतरावर चौल नावाचे ऐतिहासिक गाव असून तेथे पोर्तुगीजांच्या वास्तूंचे भाग्नावाशेस, बौद्ध गुहा, हमाम खाना, चर्च, आणि ज्यू लोकांचे प्रार्थनागृह ही आहे.

 • हरिहरेश्वर समुद्रकिनारा :

  समुद्रकिनाऱ्यावरील वारा,मृदु रेती प्रेक्षकांना आकर्षित करते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ नमुने उपलब्ध आहेत. खाडीच्या उत्तरेस एक लहानशी बोटदेखील घेता येते आणि मराठा साम्राज्याचे “पेशवा” किंवा पंतप्रधानांचे वास्तव्य जेथे वास्तव्य केले आहे ती जागा आपण पाहू शकतो.. श्रीवर्धनला “पेशवा स्मारक” हेच स्वारस्य आहे. शांत समुद्र आणि सुसंस्कृत किनारपट्टीसाठी असलेले हरिहरेश्वर हे कालभैरव (शिवमंदिर) साठी सुद्धा ओळखले जाते. 

 • आक्षी समुद्रकिनारा :

  आक्षी समुद्र्किनारा अलिबाग शहरापासून साधारण 5 किमी अंतरावर आहे. समुद्रकिनाऱ्यावर सुरुची झाडे आणि पांढरी वाळू आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. तसेच विविध प्रकारचे पक्षी आणि वनस्पती ही आपल्याला पहावयास मिळतात.

 • नागाव समुद्रकिनारा :

  नागाव समुद्र्किनारा अलिबागपासून साधारण 7 किमी अंतरावर रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रेवदंडा मार्गावर स्थित आहे. समुद्रकिनारा सुरूच्या झाडांनी व्यापलेला आहे आणि समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. येथे बोट राईड, कायाकिंग सारख्या जल क्रीडा उपलब्ध आहेत. हा समुद्र्किनारा पिकनिक आणि महिनाअखेर सुट्ट्याकरिता लोकप्रिय आहे. जवळच्या परिसरात राहण्याकरिता कॉटेज आणि बंगले उपलब्ध आहेत. समुद्र किनारी बाजूने भरपूर प्रमाणात सुपारी, नारळ आणि नारळाची झाडे आहेत सोबत अरबी समुद्राच्या लाटांचा आनंद पर्यटक घेवू शकतात.

छायाचित्र दालन

 • अलिबाग समुद्रकिनारा
 • काशीद समुद्रकिनारा
 • मांडवा समुद्रकिनारा

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र ही आहेत.

रेल्वेने

सर्व पर्यटन स्थळासाठी मुंबई (सीएसटी), एलटीटी, कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्टेशन (रायगड जिल्ह्यात) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेचे जवळचे रेल्वे स्थानक पेन्, रोहा, वीर इत्यादी आहेत. पनवेल जंक्शन जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. ते मुंबईला (हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग), ठाणे (ट्रान्स हार्बर लाइन), रोहा, वसई (पश्चिम रेल्वे) याद्वारे जोडलेले आहे. नेरळहून माथेरान पर्यंत एक “नेरो गेज” रेल्वे मार्ग आहे, याला माथेरान हिल रेल्वे असे म्हणतात.

रस्त्याने

रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) बसांद्वारे रस्त्यांनी जोडलेली आहेत. रायगड जिल्हा सायन-पनवेल एक्सप्रेसवेने मुंबईशी जोडला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ४ हे पनवेल, खालापूर आणि खोपोलीमार्गे जातात. राष्ट्रीय महामार्ग १७, जो पनवेल येथे सुरु होतो , तो पोलादपूरमार्गे पूर्ण जिल्ह्तातून जातो.