बंद

राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र

* माननीय मुख्यामंत्री महाराष्ट्र राज्य यांनी कोरोना संक्रमण काळात NIC ने केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढले त्याबद्दलचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा


राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या NICNET वरून घेण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या व्हिडिओ कॉन्फरेंन्स :

 • Honorable President of India's VC
 • PM in Education Reforms VC
 • Hon'ble CM Maharashtra Conducting VC...
 • Hon'ble CM Maharashtra Conducting VC..

राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र

राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत असलेला एक प्रमुख विज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान विभाग आहे.

राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन, जिल्हे आणि इतर शासकीय संस्थांना नेटवर्क आणि ई-शासन मध्ये सहाय्य प्रदान करीत आहे. हे राष्ट्रव्यापी नेटवर्कसह विकेंद्रीकृत नियोजन, सरकारी सेवांमध्ये सुधारणा आणि राष्ट्रीय आणि स्थानिक सरकारच्या व्यापक पारदर्शकता यासह आयसीटी सेवांची विस्तृत श्रेणी सादर करते.

राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे केंद्रीय आणि राज्य सरकारच्या निकट सहकार्याने माहिती व तंत्रज्ञान प्रकल्पांची अंमलबजावणी करते. राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे सुनिश्चित करते की माहिती व तंत्रज्ञानच्या सर्व नवीनतम तंत्रज्ञान त्याच्या क्षेत्रातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असावे. हे सरकारच्या कामकाजात माहिती व तंत्रज्ञानच्या सेवा प्रदात्यांपैकी एक आहे.

उद्दीष्टे:

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र रायगड (महाराष्ट्र राज्य) १९८९ मध्ये विविध सरकारी मंत्रालयांना / विभाग व जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याकरिता संगणक-आधारित माहिती आणि आय.सी.टी. संस्कृतीचा प्रसार करण्याच्या तसेच नेटवर्किंग, आय.सी.टी. सुविधा, डाटाबेस मॅनेजमेंट प्रोग्रॅम आवश्यक माहिती जलद आणि योग्यरित्या तयार केलेल्या स्वरूपात मिळवण्यासाठी दीर्घकालीन उद्दीष्टाने स्थापना करण्यात आली. एन.आय.सी. जिल्हा केंद्रांचे उद्दीष्ट थोडक्यात खालील प्रमाणे सारांशित केले जाऊ शकते:

 • जिल्ह्यातील सर्व केंद्र सरकार, राज्य सरकारचे विभाग आणि संस्था आणि इतर शासकीय संस्थांना ई-गव्हर्नन्ससाठी नेटवर्क आधार प्रदान करणे.
 • एन.आय.सी.च्या राष्ट्रव्यापी दळणवळण नेटवर्कद्वारे माहिती, सुविधांची व्यापक श्रेणी इत्यादी विकेंद्रीकृत नियोजन, उत्तम व अधिक कुशल प्रशासन यासाठी पुरविणे, तसेच केंद्र सरकार, राज्य सरकारचे विभाग, सर्व जिल्हा प्रशासन आणि संघटनांची उत्पादकता वाढविणे.
 • केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासनाकडून प्रायोजित विविध सॉफ्टवेअर व आयटी प्रकल्पांची संबंधित प्रशासकीय विभाग / संघटनांमध्ये उदा. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा कोषागार कार्यालये, जिल्ह्यामधील इतर सर्व सरकारी संस्था आणि विभागांमध्ये अंमलबजावणी करणे.
 • विविध प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग आणि संघटना व विविध माहिती व आय.सी.टी. सेवांच्या वापरकर्त्यांसाठी, वापरकर्त्याच्या अनुकूल वातावरणात आवश्यक असलेले सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रदान करणे.
 • जिल्ह्यातील सर्व विभाग, सरकारी संस्था आणि आय.सी.टी. संबंधित प्रकरणांमध्ये सर्व प्रकारचे तांत्रिक सहाय्य, मदत, सहकार व समुपदेशन करणे.

एन.आय.सी. जिल्हा केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथील नेटवर्क सेटअप आकृती :

नेटवर्क सेटअप

एन.आय.सी. जिल्हा केंद्रामधील इन्फ्रास्ट्रक्चरल सेटअप :

 • रॅक माउंटेड एम.एस-विंडोज २००८ आर २ एंटरप्राइज (६४-बिट) सर्व्हर.
 • रॅक माउंटेड एफ.टी.पी. सर्व्हर.
 • रेडहेट लिनक्स सर्व्हर.
 • एम.एस-विंडोज ७ आणि एम.एस-विंडोज १० प्रोफेशनल (६४-बिट) (क्लायंट).
 • एच.पी. लेझरजेट एम.एफ.पी. (मल्टीफंक्शन प्रिंटर).
 • उच्च वीज पुरवठा क्षमता असणारी ऑन-लाइन यू.पी.एस. प्रणाली.
 • ३४ एम.बी.पी.एस. लीझ्ड लाइनद्वारे (एम.एल.एल.एन.) इंटरनेटची उपलब्धता.
 • ऑप्टिकल फायबर, कॅट ६ यू.टी.पी. केबल्स आणि लेयर २ नेटवर्क स्विचेसद्वारे संरचित लॅन सेटअप.

एन.आय.सी. च्या मदत आणि सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सुविधा व सेवा :

 • संरचित लॅनद्वारे ३४ एम.बी.पी.एस. मॅनेज्ड लीज्ड लाइन नेटवर्क (एम.एल.एल.एन.) द्वारे हाय स्पीड इंटरनेट सुविधा.
 • मॅनेज्ड लीज्ड लाइन नेटवर्कद्वारे (एम.एल.एल.एन.) आय.पी. द्वारे स्टुडिओ क्वालिटी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग सुविधा.
 • जिल्हाधिकारी कार्यालयीन वेबसाईटचे नियमित अद्यतनित करणे.
 • रायगड जिल्ह्यातील सर्व १५ तहसील कार्यालयांच्या वेबसाईट्सना अद्यतनित करणे.
 • सर्व माहिती व आय.सी.टी. संबंधित प्रकल्पांवर जिल्हा प्रशासनाला पूर्ण तांत्रिक मदत आणि सहकार्य.

एन.आय.सी. ची तांत्रिक मदत आणि सहकार्यासह अनुप्रयोग सॉफ्टवेअर / प्रोजेक्ट यशस्वीरित्या अंमलबजावणी आणि कार्यवाही :

राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र, अलिबाग-रायगड (महाराष्ट्र)

पत्ताः

जिल्हाधिकारी कार्यालय,

मु.पो. – अलिबाग, जिल्हा-रायगड,

पिन-४०२२०१

दूरध्वनी क्र.  ०२१४१-२२२११८

ईमेल आयडी: mahrai[at]nic[dot]in

जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी (डी.आय.ओ.)

श्री. चिन्ता मणि मिश्रा, वैज्ञानिक- एफ / वरिष्ठ तांत्रिक संचालक (एस.टी.डी.)

अपर जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी (ए.डी.आय.ओ.)

श्री.निलेश निवृत्ती लांडगे, (वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक -ए)