राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र
राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र (NIC) हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया (MeitY) अंतर्गत भारत सरकारचे तंत्रज्ञान सहाय्यक आहे. विकासाच्या विविध पैलूंमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना तंत्रज्ञान-आधारित उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने 1976 मध्ये याची स्थापना करण्यात आली. केंद्र सरकारला माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान (ICT) आणि ई-गव्हर्नन्स सहाय्य स्वीकारण्यात आणि प्रदान करण्यात NIC महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्राच्या अत्याधुनिक IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मल्टी-गिगाबिट पॅन इंडिया नेटवर्क NICNET, नॅशनल नॉलेज नेटवर्क, नॅशनल डेटा सेंटर्स, नॅशनल क्लाउड, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ईमेल आणि मेसेजिंग सर्व्हिसेस, कमांड अँड कंट्रोल सेंटर, मल्टी-लेयर GIS आधारित प्लॅटफॉर्म, डोमेन नोंदणी आणि वेबकास्ट यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्राने नागरिकांना डिजिटल पद्धतीने सक्षम करण्यासाठी ‘वन-नेशन वन-प्लॅटफॉर्म’ उपक्रमासह देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत. त्याच्या सेवांमुळे नागरिक, सरकारी कर्मचारी आणि व्यवसाय यांच्याशी सरकारचा परिपूर्ण संवाद निर्माण झाला आहे. नवीन तंत्रज्ञान केंद्रित अभ्यास करणे, त्यांचा शासनात वापर करणे आणि प्रयोग करणे या उद्देशाने NIC ने डेटा अँनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन आणि अँप्लिकेशन सुरक्षा या सर्व बाबींवर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ची स्थापना केली आहे.
प्रगत आणि मजबूत पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच ऑन-ग्राउंड सेवांसह, NIC सर्वसमावेशक डिजिटल लँडस्केपद्वारे नागरिकांना सरकारशी जोडत आहे आणि ज्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान-सक्षम सेवा पोहोचत नव्हत्या त्यांच्यापर्यंत त्या पोहोचविण्याची खात्री देते.
उद्दीष्टे:
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र रायगड (महाराष्ट्र राज्य) १९८९ मध्ये विविध सरकारी मंत्रालयांना / विभाग व जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याकरिता संगणक-आधारित माहिती आणि आय.सी.टी. संस्कृतीचा प्रसार करण्याच्या तसेच नेटवर्किंग, आय.सी.टी. सुविधा, डाटाबेस मॅनेजमेंट प्रोग्रॅम आवश्यक माहिती जलद आणि योग्यरित्या तयार केलेल्या स्वरूपात मिळवण्यासाठी दीर्घकालीन उद्दीष्टाने स्थापना करण्यात आली. एन.आय.सी. जिल्हा केंद्रांचे उद्दीष्ट थोडक्यात खालील प्रमाणे सारांशित केले जाऊ शकते:
- जिल्ह्यातील सर्व केंद्र सरकार, राज्य सरकारचे विभाग आणि संस्था आणि इतर शासकीय संस्थांना ई-गव्हर्नन्ससाठी नेटवर्क आधार प्रदान करणे.
- एन.आय.सी.च्या राष्ट्रव्यापी दळणवळण नेटवर्कद्वारे माहिती, सुविधांची व्यापक श्रेणी इत्यादी विकेंद्रीकृत नियोजन, उत्तम व अधिक कुशल प्रशासन यासाठी पुरविणे, तसेच केंद्र सरकार, राज्य सरकारचे विभाग, सर्व जिल्हा प्रशासन आणि संघटनांची उत्पादकता वाढविणे.
- केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासनाकडून प्रायोजित विविध सॉफ्टवेअर व आयटी प्रकल्पांची संबंधित प्रशासकीय विभाग / संघटनांमध्ये उदा. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा कोषागार कार्यालये, जिल्ह्यामधील इतर सर्व सरकारी संस्था आणि विभागांमध्ये अंमलबजावणी करणे.
- विविध प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग आणि संघटना व विविध माहिती व आय.सी.टी. सेवांच्या वापरकर्त्यांसाठी, वापरकर्त्याच्या अनुकूल वातावरणात आवश्यक असलेले सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रदान करणे.
- जिल्ह्यातील सर्व विभाग, सरकारी संस्था आणि आय.सी.टी. संबंधित प्रकरणांमध्ये सर्व प्रकारचे तांत्रिक सहाय्य, मदत, सहकार व समुपदेशन करणे.
एन.आय.सी. जिल्हा केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथील नेटवर्क सेटअप आकृती :
एन.आय.सी. जिल्हा केंद्रामधील इन्फ्रास्ट्रक्चरल सेटअप :
- रॅक माउंटेड एम.एस-विंडोज २००८ आर २ एंटरप्राइज (६४-बिट) सर्व्हर.
- रॅक माउंटेड एफ.टी.पी. सर्व्हर.
- रेडहेट लिनक्स सर्व्हर.
- एम.एस-विंडोज ७ आणि एम.एस-विंडोज १० प्रोफेशनल (६४-बिट) (क्लायंट).
- एच.पी. लेझरजेट एम.एफ.पी. (मल्टीफंक्शन प्रिंटर).
- उच्च वीज पुरवठा क्षमता असणारी ऑन-लाइन यू.पी.एस. प्रणाली.
- ३४ एम.बी.पी.एस. लीझ्ड लाइनद्वारे (एम.एल.एल.एन.) इंटरनेटची उपलब्धता.
- ऑप्टिकल फायबर, कॅट ६ यू.टी.पी. केबल्स आणि लेयर २ नेटवर्क स्विचेसद्वारे संरचित लॅन सेटअप.
एन.आय.सी. च्या मदत आणि सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सुविधा व सेवा :
- संरचित लॅनद्वारे ३४ एम.बी.पी.एस. मॅनेज्ड लीज्ड लाइन नेटवर्क (एम.एल.एल.एन.) द्वारे हाय स्पीड इंटरनेट सुविधा.
- मॅनेज्ड लीज्ड लाइन नेटवर्कद्वारे (एम.एल.एल.एन.) आय.पी. द्वारे स्टुडिओ क्वालिटी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग सुविधा.
- जिल्हाधिकारी कार्यालयीन वेबसाईटचे नियमित अद्यतनित करणे.
- रायगड जिल्ह्यातील सर्व १५ तहसील कार्यालयांच्या वेबसाईट्सना अद्यतनित करणे.
- सर्व माहिती व आय.सी.टी. संबंधित प्रकल्पांवर जिल्हा प्रशासनाला पूर्ण तांत्रिक मदत आणि सहकार्य.
राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्राकडूनचे पुरविण्यात आलेले “७५ डिजिटल सॉफ्टवेअर सोल्युशन्स चे इ – बुक” – कृपया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
एन.आय.सी. ची तांत्रिक मदत आणि सहकार्यासह अनुप्रयोग सॉफ्टवेअर / प्रोजेक्ट यशस्वीरित्या अंमलबजावणी आणि कार्यवाही :
-
महत्वाचे राष्ट्रीय ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स / प्रकल्प :
- नॅशनल लॅण्ड रेकॉर्डस् मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम (NLRMP)
- एन आय सी सेर्विसडेस्क सपोर्ट
- नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्रॅम (NSAP)
- आधार इनेबल्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (Ae-PDS)
- जीवन प्रमाण
- डी.बी.टी – फर्टिलायझर सेक्टर (DBT – फर्टिलायझर)
- जमीन सर्वेक्षणाचे डिजिटायझिंग व मोज़ेसिंग सॉफ्टवेअर
- प्रधानमंत्री किसान सम्मान निधि
- जनगणना 2021 – जनगणना देखरेख व व्यवस्थापन प्रणाली
- एम.पी.एल.ए.डी.एस. प्रकल्प जिल्हा नियोजन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय.
- पी.एम.जी.एस.वाय. प्रकल्प, जिल्हा परिषद कार्यालय.
- आय.डी.आर.एन. (भारत आपत्ती संसाधन नेटवर्क) प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय.
- जिल्ह्यातील ९ ए.पी.एम.सी. मध्ये एग्मार्कनेट प्रकल्प.
- रायगड जिल्ह्यातील 25 पोलीस ठाणे (दुस-या आणि तिस-या टप्प्यानुसार) अंतर्गत कॉमन इंटिग्रेटेड पोलिस ऍप्लिकेशन (सी.आय.पी.ए.).
- जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये चालू असलेला कॉनफोनेट (देशांतर्गत ग्राहक मंचचे संगणक आणि संगणक नेटवर्किंग) प्रकल्प.
- आय.डी.एस.पी. (एकात्मिक रोग नियंत्रण युनिट सर्वेक्षण) प्रकल्प, जिल्हा परिषद कार्यालय.
- लीज्ड लाइन मार्गे पोस्ट नेटवर्किंग प्रकल्प, मुख्य पोस्ट ऑफिस अलिबाग व पनवेल.
- न.रे.गा. (राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) प्रकल्प.
- शस्त्र परवाना राष्ट्रीय डाटाबेस प्रकल्प.
- सांसद आदर्श ग्राम योजना.
-
राज्यातील महत्वाचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स / प्रकल्प :
- लँड बँक सॉफ्टवेअर प्रकल्प
- इ – क्युजे कोर्ट
- कातकरी समाज उत्थान सर्वेक्षण अभियान
- वेब सक्षम महाफुड प्रकल्प, जिल्हा पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय.
- वेब सक्षम स्वातंत्र्य सेनानी माहिती प्रणाली, जिल्हाधिकारी कार्यालय.
- वेब सक्षम ई.जी.एस. माहिती प्रणाली, रोजगार हमी योजना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय.
- वेब पंचायती राज संस्था लेखा सॉफ्टवेअर, जिल्हा परिषद.
- वेब सक्षम दैनिक पावस अहवाल प्रणाली, जिल्हाधिकारी कार्यालय व कृषि कार्यालय.
- वेब सक्षम बीडीएस (बजेट वितरण प्रणाली), जिल्हा कार्यालय
- वेब सक्षम मालमत्ता ई-व्यवस्थापन प्रणाली, एन.आय.सी. (ई-एम.ए.एन.)
-
जिल्ह्यातील महत्वाचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स / प्रकल्प :
- टपाल माहिती प्रणाली, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय.
- जिल्हा न्यायालय माहिती प्रणाली (डी.सी.आय.एस.), जिल्हा न्यायालय.
- रोजगार मित्र सॉफ्टवेअरद्वारे बेरोजगार तरुणांच्या नोंदणी, डी.ई. आणि एस.ई.जी.ओ.
- पेन्शन ऑटोमेशन प्रणाली, जिल्हा कोषागार कार्यालय.
- एक्सएक्ट इंटिग्रेटेड ऑन लाइन सिस्टम व्हर्जन २.८, जिल्हा कोषागार कार्यालय.
- मालमत्ता कार्ड माहिती प्रणाली (पी.सी.आय.एस.), टी.आय.एल.आर. कार्यालय.
राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र, अलिबाग-रायगड (महाराष्ट्र)
पत्ताः
जिल्हाधिकारी कार्यालय,
मु.पो. – अलिबाग, जिल्हा-रायगड,
पिन-४०२२०१
दूरध्वनी क्र. ०२१४१-२२२११८
ईमेल आयडी: mahrai[at]nic[dot]in
जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी-प्रभारी (डी.आय.ओ.)
श्री.निलेश निवृत्ती लांडगे
अपर जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी (ए.डी.आय.ओ.)
श्री.निलेश निवृत्ती लांडगे