रायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे
-
वरदविनायक मंदिर, महड :
वरदविनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे मंदिर आहे. असे म्हटले जाते की पेशव्यांचे सेनापती रामजी महादेव बिवालकर यांनी हे १७२५ साली मंदिर बांधले (जीर्णोद्धार केला). या मंदिरामध्ये नवग्रह देवतांची, शिवलिंग आणि मूषकाची मूर्ती देखील आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना चार पहारेकरी हत्तीच्या मूर्ती आहेत. भक्त वरदविनायक मंदिर पवित्रस्थानी वर्षभर भेटी देतात. माघ-चतुर्थीसारख्या सणांमध्ये, या मंदिरात प्रचंड गर्दी दिसून येते.
वरदविनायक मंदिर रायगड जिल्ह्यातील खोपोली या गावा जवळ, खालापूर तालुक्यातील महड या गावात आहे.
-
बल्लाळेश्वर मंदिर, पाली :
बल्लाळेश्वर मंदिर हे गणपती देवाचे आठ अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर पाली गावात असून रायगड जिल्ह्यातील कर्जतपासून सुमारे ६० किमी अंतरावर आहे. हे ठिकाण सागरगड किल्ला आणि अंबा नदी पासून जवळच आहे.
असे म्हणतात की मोरेश्वर विठ्ठल सिंदकर (दिघे) यांनी इसवी सन १६४० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात एक पुरातन घंटा असून तिला चिमाजी आप्पांनी वसई आणि सस्तीमधील लढाईत पोर्तुगीजांना पराभूत करून आणले होते. १७६० साली मूळ लाकडी मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले व श्री फडणीस यांनी दगडी मंदिर आकारास आणले.
-
हरिहरेश्वर मंदिर, श्रीवर्धन :
हरिहरेश्वर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. असे म्हटले जाते की हरिहरेश्वराचे मंदिर भगवान शिव यांनी आशीर्वादित केले आहे. हरिहरेश्वर पेशवे यांच्या घराण्याची देवता किंवा कुलदैवत आहे. पेशव्यांनी इसवी सन १७२३ मध्ये हरिहरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला.
काळभैरव मंदिर, महालक्ष्मी मंदिर इत्यादी हरिहरेश्वरच्या परिसरातील इतर मंदिरे आहेत. हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवेआगर हे तीनही एक लोकप्रिय समुद्र किनारी पर्यटन आकर्षण आहेत.
-
कनकेश्वर मंदिर, अलिबाग :
कनकेश्वर मंदिर अलिबागपासून १० किमी अंतरावर असून तिथे जुने शिव मंदिर आहे. हे मंदिर एका लहान टेकडीवर वसलेले आहे आणि अलिबागपासून जवळच मापगाव हे गाव सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे. टेकडी जवळजवळ ३७० मीटर उंच आहे आणि मंदिरकडे जाण्यासाठी ७००+ पायऱ्या आहेत. मंदिरजवळ ‘नागोबाचा टप्पा’, ‘देवची पायरी’, ‘पुष्कर्णी’, ‘गायमुख’ आणि ‘व्याघ्रेश्वर’ इत्यादी आपल्याला पाहायला मिळते.
-
सुवर्णगणेश मंदिर, दिवेआगर :
सुवर्णगणेश मंदिर, दिवेआगर, अलिबागपासून साधारण ७५ किमी अंतरावर आहे. सुवर्णगणेश इतिहास खूपच आकर्षक आहे. जमीनीखाली मंदिराजवळील नारळाच्या बागेत एक तांब्याची पेटी आढळली. त्या पेटीत सोन्याची गणपती एक मूर्ती तसेच गणपतीचे दागिने आढळून आले. सुवर्णगणेश ही गणपतीची मूर्ती असून मूर्तीचे वजन सुमारे १ किलो पेक्षा अधिक आहे. स्थानिकांच्या मते, सुवर्णगणेश मूर्ती अंदाजे ३०० ते ४०० वर्षे प्राचीन आहे.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?:
विमानाने
जवळचे विमानतळ लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र ही आहेत.
रेल्वेने
सर्व पर्यटन स्थळासाठी मुंबई (सीएसटी), एलटीटी, कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्टेशन (रायगड जिल्ह्यात) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेचे जवळचे रेल्वे स्थानक पेन्, रोहा, वीर इत्यादी आहेत. पनवेल जंक्शन जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. ते मुंबईला (हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग), ठाणे (ट्रान्स हार्बर लाइन), रोहा, वसई (पश्चिम रेल्वे) याद्वारे जोडलेले आहे. नेरळहून माथेरान पर्यंत एक “नेरो गेज” रेल्वे मार्ग आहे, याला माथेरान हिल रेल्वे असे म्हणतात.
रस्त्याने
रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) बसांद्वारे रस्त्यांनी जोडलेली आहेत. रायगड जिल्हा सायन-पनवेल एक्सप्रेसवेने मुंबईशी जोडला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ४ हे पनवेल, खालापूर आणि खोपोलीमार्गे जातात. राष्ट्रीय महामार्ग १७, जो पनवेल येथे सुरु होतो , तो पोलादपूरमार्गे पूर्ण जिल्ह्तातून जातो.