रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण
माथेरान
माथेरान हे एक वृक्षाच्छादित असलेले ८०० मीटर उंचीवर असलेलले एक थंड हवेचे ठिकाण आहे. प्रवासाकरीता एक टॉय ट्रेन सुद्धा उपलब्ध आहे. वैकल्पिकरित्या तुम्ही तुमच्या खाजगी वहानानी ११ किलोमीटरचा प्रवास करून जावू शकता.
माथेरानच्या उंच खड्ड्यांसह, खालील पठार आकर्षक दृश्य अनुभवू शकता. रात्रीच्या वेळी मुंबई ठिकाणचे दिव्यांची रोशनाई दिसते. माथेरानमध्ये पुढील पिकनिक स्थळे तुम्ही पाहू शकता – पॅनोरामा पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, इको पॉईंट, लॉर्ड पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, पेमास्टर्स पार्क, पोर्कूपाइन पॉईंट (सनसेट पॉईंट), रामबाग पॉईंट, अॅलेक्झांडर पॉईंट, लुईओसा पॉइंट इत्यादी.सर्व पिकनिक स्थळे पाहण्यासाठी घोड्यांची सवारी उपलब्ध आहे.येथेशिवाजी महाराज्यांच्या जीवानावर स्थित असे वस्तू-संग्रालय आहे.
मुख्य बाजारामध्ये लेदरच्या वस्तू, टोपी, चप्पल, चिककी इ. खरेदी करू शकता. माथेरान परिसरात कोणत्याही प्रकारच्या वाहनास परवानगी नाही.ज्यामुळे ते खूप शांत आणि प्रसन्न ठिकाण आहे.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?:
विमानाने
जवळचे विमानतळ लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र ही आहेत.
रेल्वेने
नेरेल स्टेशन, २० किलोमीटर दूर आहे जेथे आपण टॉय ट्रेन पकडू शकता.
रस्त्याने
मुंबई हा रस्ता माथेरान ते कर्जत आणि नेरल मार्गे ११० किमी अंतरावर आहे. पुणे १२०किमी दूर आहे.