बंद

कोकम सरबत

प्रकार:   पेय
कोकम शरबत

कोकम सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य साहित्य (१ ग्लास साठी) :

कोकम सिरप- १ टेबलस्पून
थंड पाणी- साधारण २०० मिली (म्हणजे एका ग्लासात राहील इतके)
शेंदेलोण/सैंधव मीठ किंवा पादेलोण किंवा साधे मीठ- लहान चिमूटभर
भाजलेल्या जीऱ्याची पूड- १/४ टिस्पून किंवा चवीनुसार
पिठीसाखर- आवश्यकतेनुसार (गरज असल्यास, कोकमांच्या आंबटपणावर अवलंबून आहे.)
पुदिना पाने- सजावटीसाठी (ऐच्छिक)
बर्फाचे तुकडे किंवा चुरा- आवश्यकतेनुसार

कृती:

एका काचेच्या ग्लासमध्ये कोकम सिरप, थंड पाणी, मीठ, जिरेपूड, पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे.
पुदीना पाने तोडून घालावी. बर्फाचे तुकडे घातले की सरबत पिण्यास तयार.