* माननीय मुख्यामंत्री महाराष्ट्र राज्य यांनी कोरोना संक्रमण काळात NIC ने केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढले त्याबद्दलचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
अलिबाग येथील पीएनपी कॉलेजमध्ये सुरक्षित इंटरनेट दिवस २०२६ चे आयोजन करण्यात आले.
अलिबाग येथील पीएनपी कॉलेजमध्ये सुरक्षित इंटरनेट दिवस २०२६ चे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र (NIC) हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया (MeitY) अंतर्गत भारत सरकारचे तंत्रज्ञान सहाय्यक आहे. विकासाच्या विविध पैलूंमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना तंत्रज्ञान-आधारित उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने 1976 मध्ये याची स्थापना करण्यात आली. केंद्र सरकारला माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान (ICT) आणि ई-गव्हर्नन्स सहाय्य स्वीकारण्यात आणि प्रदान करण्यात NIC महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्राच्या अत्याधुनिक IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मल्टी-गिगाबिट पॅन इंडिया नेटवर्क NICNET, नॅशनल नॉलेज नेटवर्क, नॅशनल डेटा सेंटर्स, नॅशनल क्लाउड, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ईमेल आणि मेसेजिंग सर्व्हिसेस, कमांड अँड कंट्रोल सेंटर, मल्टी-लेयर GIS आधारित प्लॅटफॉर्म, डोमेन नोंदणी आणि वेबकास्ट यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्राने नागरिकांना डिजिटल पद्धतीने सक्षम करण्यासाठी ‘वन-नेशन वन-प्लॅटफॉर्म’ उपक्रमासह देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत. त्याच्या सेवांमुळे नागरिक, सरकारी कर्मचारी आणि व्यवसाय यांच्याशी सरकारचा परिपूर्ण संवाद निर्माण झाला आहे. नवीन तंत्रज्ञान केंद्रित अभ्यास करणे, त्यांचा शासनात वापर करणे आणि प्रयोग करणे या उद्देशाने NIC ने डेटा अँनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन आणि अँप्लिकेशन सुरक्षा या सर्व बाबींवर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ची स्थापना केली आहे.
प्रगत आणि मजबूत पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच ऑन-ग्राउंड सेवांसह, NIC सर्वसमावेशक डिजिटल लँडस्केपद्वारे नागरिकांना सरकारशी जोडत आहे आणि ज्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान-सक्षम सेवा पोहोचत नव्हत्या त्यांच्यापर्यंत त्या पोहोचविण्याची खात्री देते.
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र रायगड (महाराष्ट्र राज्य) १९८९ मध्ये विविध सरकारी मंत्रालयांना / विभाग व जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याकरिता संगणक-आधारित माहिती आणि आय.सी.टी. संस्कृतीचा प्रसार करण्याच्या तसेच नेटवर्किंग, आय.सी.टी. सुविधा, डाटाबेस मॅनेजमेंट प्रोग्रॅम आवश्यक माहिती जलद आणि योग्यरित्या तयार केलेल्या स्वरूपात मिळवण्यासाठी दीर्घकालीन उद्दीष्टाने स्थापना करण्यात आली. एन.आय.सी. जिल्हा केंद्रांचे उद्दीष्ट थोडक्यात खालील प्रमाणे सारांशित केले जाऊ शकते:

जिल्हाधिकारी कार्यालय,
मु.पो. – अलिबाग, जिल्हा-रायगड,
पिन-४०२२०१
दूरध्वनी क्र. ०२१४१-२२२११८
ईमेल आयडी: mahrai[at]nic[dot]in
श्री.निलेश निवृत्ती लांडगे