जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१. सहकारी संस्था, रायगड अलिबाग
जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१. सहकारी संस्था, रायगड अलिबाग
कार्यालय प्रमुख : श्री. उ. गो. तुपे
संपूर्ण पत्ता
घर क्र. १२३५, पहिला मजला, कांग्रेस भवन, महर्षी कर्वे रोड, ता. अलिबाग जि. रायगड,पिन कोड ४०२ २०१
प्रत्यक्ष कार्य :
महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ अन्वये प्राप्त टरावान्वये सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण व परंतुकान्वये प्राप्त संस्थांचे लेखापरीक्षण, वरीष्ट कार्यालय सभा, अधिनस्त कार्यालयीन आढावा सभा कामकाज, कलम ८९ अ अन्वये तपासणी, दोष दुरूस्ती अहवाल छाननी, चाचणी लेखापरीक्षण कामकाज, फेरलेखापरीक्षण कामकाज लेखापरीक्षण अहवाल छाननी, ई-गव्हर्नन्स कामकाज, व्याज परतावा तपासणी, माहिती अधिकार कामकाज व वरीष्ठ कार्यालयाचे आदेशाप्रमाणे इतर कामकाज, अधिनस्त लेखापरीक्षक व तालुका लेखापरीक्षकांचे मदतीने कामकाज करुन घेणे व या कामकाजावर नियंत्रण ठेवणे व त्या अनुषंगिक कार्य.
कार्य:
१. रायगड जिल्हयातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम ७९ व ८१ अन्वये मा. सहकार आयुक्त व मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (लेप), मुंबई विभाग, नवी मुंबई या कार्यालयाला सहाय्यभुत भुमिका बजावणे.
२. महाराष्ट्र सहकार कायदा कलम ८१ अन्वये जिल्हयातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाबाबत व कलम ८२ अन्वये दोष दुरूस्ती अहवालाबाबत पाठपुरावा करणे, कलम ८१ (३) (क) अन्वये चाचणी लेखापरिक्षण बाबत पाठपुरावा करणे व फेरलेखापरीक्षण कामकाजाबाबत पाठपुरावा करणे तसेच जिल्हयातील सर्व लेखापरीक्षण कार्यालयामध्ये समन्वय साधणे व त्यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
३. जिल्हयातील शासकीय लेखापरीक्षण शुल्क वसुली बाबत पाठपुरावा करणे,
४. जिल्हयातील अधिनस्त लेखापरीक्षण कार्यालयाच्या वेतन व इतर खर्चासाठी अंदाजपत्रकीय कामकाजावर समन्वयाव्दारे नियंत्रण ठेवणे,
५. जिल्हयातील अधिनस्त कार्यालयांमधील वर्ग-२, वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांच्या आस्थापनाविषय बाबींचे आदेश मंजुर करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
६. जिल्हयातील अधिनस्त लेखापरीक्षण कार्यालयाची कार्यालयीन तपासणी करणे व त्यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
७. जिल्हयातील महत्वाच्या व आवश्यक बावी मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना व मा. विभागीय सहनिबंधक, सह. संस्था (लेप), मुंबई विभाग, नवी मुंबई यांच्या मार्फत निदर्शनास आणून देणे