जिल्हा कोषागार कार्यालय रायगड
संपर्क :–
- जिल्हा कोषागार कार्यालय रायगड – (02141) 222193,222092
- सहसंचालक,लेखा व कोषागारे,कोंकण विभाग,कोंकण भवन,नवी मुंबई-(022)-27580321,27572582
- संचालक,लेखा व कोषागारे,मुंबई-022-022880106
महत्वाचे कामे :-
कोषागारे :-
- शासकीय कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या विविध मुख्य लेखाशिर्षाखाली विविध प्रकारची देयके पारित व त्यांचे प्रदान करणे
- विविध मुख्य लेखाशिर्षनिहाय जमा होणाऱ्या रकमांचे दैनंदिन स्वरुपात एकत्रिकरण करणे
- जमा-खर्चाच्या दैनंदिन यादीसह प्रदानप्रित्यर्थ प्राप्त झालेली सर्व प्रमाणके व जमा रकमेची चलने यांचा मासिक लेखा विहित दिनांकाला महालेखाकार कार्यालयाकडे सादर करणे
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीविषयक लाभाचे प्रदान करणे,तसेच मासिक निवृत्तीवेतनाचे(कुटुंब निवृत्तीवेतनासह) प्रदान करणे
- विशिष्ट प्रकारच्या मुद्रांकाची योग्य रक्कम स्विकारुन विक्री करणे
- उपकोषगार कार्यालये यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे
उपकोषागारे :-
- तालुका पातळीवर कार्यरत उपकोषागार कार्यालय हे संचालनालयाचे अधिनस्त सर्वात कनिष्ठ कार्यालय आहे
- शासकीय कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या विविध मुख्य लेखाशिर्षाखाली विविध प्रकारची देयके पारित व त्यांचे प्रदान करणे
- विविध मुख्य लेखाशिर्षानिहाय जमा होणाऱ्या रकमांचे दैनंदिन स्वरुपात एकत्रिकरण करणे
- जमा-खर्चाच्या दैनंदिन लेखे,सर्व प्रमाणके व जमा रकमेची चलने जिल्हा कोषागार कार्यालयास व्यवहाराचे दुसऱ्या दिवशी सादर करणे
- विशिष्ट प्रकारच्या मुद्रांकाची योग्य रक्कम स्विकारुन विक्री करणे
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना :-
- आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेली कर्मचाऱ्यांची माहिती कोषागारामार्फत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडे पाठविणे आणि त्यांच्याकडून प्राप्त होणारा कायम निवृत्तीवेतन क्रमांक (PRAN) कोषागारामार्फत आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे देणे
- आहरण व संवितरण अधिकारी याने सेवा अभिलेखात नोंद ठेवून कर्मचाऱ्यास कळविणे.कर्मचाऱ्याचे अभिलेखे ठेवणे,त्यांच्या जमा झालेल्या निधीची गुंतवणूक करणे व कर्मचाऱ्यास प्राप्त झालेले लाभ याची माहिती वेळोवेळी उपलब्ध करुन देणे
- कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा झालेले त्याचे स्वत:चे अंशदान व त्यावर देय असलेले समतुल्य/शासनाने निश्चित केलेल्या दराने शासनाचे अंशदान या रकमा कोषागारामार्फत मे.एनएसडिएल ई गर्व्हनन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांचेकडे पाठविणे
- केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण व कोषागार कार्यालये यांचेमध्ये समन्वय साधून योजनेचे काम पूर्ण करणे.
कार्यालयाचे संगणकीकरण
राज्यातील कोषागार व उपकोषागारांचे मोठया प्रमाणावर संगणकीरण करण्यात आले आहे.विविध संगणकीय आज्ञावलींचा उपयोग लेखे तयार करण्यासाठी व जतन करण्यासाठी तसेचे वेतन व निवृत्तीवेतन प्रदान करण्यासाठी होतो.
1 |
कोषवाहिनी |
लेखाशिर्षावर जमा व खर्चाचे मासिक लेखे अहवाल |
2 |
ट्रेझरी नेट |
कोषागारात संगणकीय पद्धतीने देयके पारित करणे व लेखे तयार करण्यासाठीची प्रणाली |
3 |
बीम्स |
अर्थसंकल्पीय अंदाज,मंजूर अनुदानाचे वितरण आणि करण्यात आलेला खर्च प्राधिकृत करण्यासाठी |
4 |
ग्रास |
ई पेमेंट गेटवेद्वारे शासकीय महसूल जमा करणे |
5 |
अर्थवाहिनी |
कोषागारातील जमा व खर्चाचे लेखे,मास्टर डाटा व ट्रेझरीनेट प्रणालीचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यासाठीची माहिती पेढी. |
6 |
सेवार्थ |
कर्मचाऱ्यांची आवश्यक माहिती नोंदवून वेतन देयके तयार करणे आणि कर्मचाऱ्याच्या खात्यात वेतन थेट जमा करण्याकरिता |
7 |
निवृत्तीवेतन वाहिनी |
निवृत्तीवेतनधारकांच्या बँक खात्यात निवृत्तीवेतनाची रक्कम थेट आणि विहित वेळेत जमा करण्याकरिता |
8 |
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आज्ञावली |
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखालील कर्मचाऱ्यांचे लेखांकन,वार्षिक लेखा ठेवणे,परतावा,वार्षिक लेखाचिठ्ठी तयार करण्यासाठी |
|
अ) Protean NPS Scan |
कर्मचाऱ्यांचे मासिक अंशदान अपलोड करणे व व्यवहार क्रमांक संस्करित करणे |
|
ब) Protean CRA |
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचे प्रान क्रमांक संस्करित करणे,वार्षिकी लेखे ठेवणे, कर्मचाऱ्यांची अंशत: परताव्याची प्रकरणे व अंतिम परताव्याच्या प्रकरणांचा निपटारा करणे इ.कामकाज सदरच्या प्रणालीमार्फत पार पाडले जाते. |
संगणकीय प्रणालीचे नाव व काम
1 |
कोषवाहिनी |
1. स्थानिक कोषागारात तयार झालेल्या लेख्यासंबंधातील माहिती दर्शविणे 2. कोषागारातील प्रदाने, योजनानिहाय जमा व खर्च,प्रलंबित देयके इत्यादी तपशील दर्शविणे 3. राज्यातील सर्व कोषागार कार्यालयामध्ये अंतिम मंजूर निवृत्तीवेतन प्रकरणांचा डेटा दर्शविणे |
2 |
ट्रेझरी नेट |
1. कोषागारांच्या लेखांकनासंबंधातील प्रमुख प्रणाली आहे 2. सेंट्रल सर्व्हरवर प्रस्थापित करण्यात आली असून त्यावर सर्व 323 उपकोषागार कार्यालये व 34 जिल्हा कोषागारे व अधिदान व लेखा कार्यालय,मुंबईसह थेट कार्यरत आहेत. 3. आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या देयकांची पोच देणे.कोषगारामध्ये विविध टप्प्यांवर ऑनलाईन पद्धतीने देयकांचे लेखा परिक्षण करुन मंजूर करणे व रकमेचे थेट आहरण व संवितरण अधिकारी/कर्मचारी/निवृत्तीवेतन धारकअधिकारी कर्मचारी/ निवृत्ती वेतनधारक / त्रयस्थ अदाता यांच्या बैंक खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने SBI-CMP FAST PLUS आणि e-kuber या दोन पोर्टलद्वारे करणे 4. संकेतस्थळांचा URL https://treasurynet.mahakosh.gov.in हा आहे. |
3 |
बीम्स |
१. अर्थसंकल्पीय अंदाज, अनुदानाचे वितरण आणि खर्च करण्यात आलेले अनुदान प्राधिकृत करण्यासाठी ही संगणकीय प्रणाली आहे.
२. यामध्ये विविध टप्प्यांवरील निधीचे हस्तांतरण जसे वाटप, वितरण, पुनर्विनियोजन, आहरण, अनुदान परत करणे इत्यादी कार्य करण्यात येतात.
३. कोषागारामध्ये सादर होणा-या प्रत्येक देयकासोबत बीम्सद्वारे तयार झालेली प्राधिकारपत्रे जोडणे आवश्यक आहे. या प्राधिकारपत्रांमध्ये अर्थसंकल्प वर्गीकरण, ठोक रक्कम वजाती, निव्वळ रक्कम, अदात्याचा तपशील इत्यादींचा अंर्तभाव आहे. 4. या संकेतस्थळाचा URL https://beams.mahakosh.gov.in हा आहे. |
4 |
ग्रास |
१. महाराष्ट्र राज्याचे कर विविध बँकांच्या इंटरनेट पोर्टलवरुन ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यासाठी विकसित केलेली आहे.
२. या सुविधेचा वापर करण्याकरिता, अभिकर्त्याकडे शासनाच्या यादीवरील कोणत्याही बँकेचे नेट बँकिंग खाते असणे आवश्यक आहे. |
5 |
अर्थवाहिनी |
1. कोषागारातील जमा व खर्चाचे लेखे, मास्टर डाटा व ट्रेझरीनेट प्रणालीचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यासाठीची माहिती पेढी आहे. 2. अर्थवाहिनी या प्रणालीतुन कोषागारनिहाय जमा व खर्चाचे महावार लेखांकन आकडेवारी डाऊनलोड करण्याकरीता महालेखापाल कार्यालयास लॉगइनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, |
6 |
सेवार्थ |
सेवार्थ ही सर्व शासकीय कर्मचा-यांकरीता वेतन अदा करण्याची प्रणाली आहे. सेवार्थ प्रणाली, बीम्स, ट्रेझरीनेट, अर्थवाहिनी, सीएमपी व इ-कुबेर प्रणालीसोबत संलग्न करण्यात आलेली आहे. मुख्य कार्ये- १. अर्थसंकल्पीय योजना संकेतांक तसेच आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक निहाय कार्यालयांची नोंदणी, संबंधित प्रशासकीय विभागामार्फत पदांचे केंद्रीय वाटप. २. प्रशासकीय विभागाव्दारे प्रत्येक कार्यालयाकरीता मंजुर पदांची नोंद करणे ३. कर्मचा-यांची नोंदणी आणि युनिक एम्पलॉई आयडी सेवार्थ आयडी/डीसीपीएरा आयडी देणे, कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणारे भत्ते व त्यांच्या वेतनातील वजातीची नोंद करणे. ४. शासनाने दिलेल्या कर्ज व अग्रिमांची वसुली, मासिक वेतन देयकातील बदलाचे विवरण पत्र तयार करणे व त्यानुसार मासिक वेतन / पुरवणी देयक तयार करणे. ५. सेवार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध लॉगईन सुविधेद्वारे महालेखापाल कार्यालय तसेच विविध प्रशासकीय विभागांना त्यांना आवश्यक विविध अहवाल उपलब्ध करून देणे. |
7 |
निवृत्तीवेतन वाहिनी |
महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तवेतनधारकांकरीता ही केंद्रीय वेब बेस्ड आज्ञावली आहे. आज्ञावलीची मुख्य कार्य खालीलप्रमाणे: १. महालेखापाल कार्यालयाकडून मंजूर करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन प्रकरणी निवृत्तीवेतन प्रदान आदेश (PPCO) उपदान प्रदान आदेश (GPC) कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर निवृत्तीपैतन आज्ञावलीमध्ये ऑनलाईन देयक तयार करण्याबाबत कार्यवाही करणे. २. मासिक निवृत्तीवेतन देयक आणि बदलाचे विवरण पत्र तयार होते. ३. वार्षिक हयातीचे दाखले जमा आणि अद्ययावत करणे. ४. निवृत्तीवेतन प्रदान आदेशांचे कोषागारांतर्गत महालेखापाल कार्यालयांतर्गत हस्तांतरण, ५. निवृत्तीवेतनधारक मृत झाल्यानंतर अतिप्रदान वसुलीबाबतचे पत्र बैंकाना निर्गमित करणे. ६. निवृत्तीवेतनधारक यांना प्रदान करण्यात आलेल्या निवृत्तीवेतनाबा तपशिल, उत्पत्राचा दाखला निवृत्तीवेतनवाहिनीमध्ये उपलब्ध आहे. ७. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. संकीर्ण २०२२/ प्र.क्र. ८२/ कोषा-प्रशा-५. दि. २४.०८.२०२३ अन्वये महालेखापाल मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व १५ जिल्हा कोषागार कार्यालयांसाठी -PPO, e-GPO, e CPO या प्रणाली कार्यान्वित आहे. ८. तसेच निवृत्तीवेतन धारकांना त्यांचे वैयक्तिक उत्पन्नाचा दाखला तसेच MONTHLY/ANNUAL PAYMENT STATEMENT उपलब्ध करून देणे. या संकेतस्थळाचा संकेतांक https://pension.mahakosh.gov.in/ हा आहे. |
8 |
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आज्ञावली |
१. दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात आली होती. सदर योजनेचे समावेशन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत करण्यात आले असुन दिनांक ०१.०४.२०१५ पासुन योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. यासाठी ही प्रणाली विकसित केलेली आहे. २. या प्रणालीत कर्मचाऱ्यांच्या नोंदणीसाठी आहरण व संवितरण अधिकारी यांना नोंदणी फॉर्म तयार करणे व अंशदानाच्या वजातीबाबतची विवरणपत्रे तयार करणे. ३. तसेच कोषागार अधिकारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागु असलेल्या कर्मचा-यांचे आहरण व संवितरण अधिकारी यांनी पाठविलेल्या नोंदणी अर्जास मान्यता देणे, कर्मचाऱ्यांच्या अंशदानाची देयकासोबत जोडलेल्या वजाती विवरणपत्रांचे लेखांकन करणे, रक्कम आहरित करणे, एकत्रित अंशदाने केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडुन व्यवहार क्रमांक घेऊन विश्वस्त बँकेकडे पाठविणे. ४. याशिवाय सांख्यिकी तपशील दर्शविणारे जसे कोषागारनिहाय कर्मचारी संख्या, आहरण व संवितरण अधिकारी संख्या याबाबतचे अहवाल कोषागार अधिकारी यांनी काढणे. ५. मिसींग क्रेडीट (गहाळ रक्कम) भरणे. |