पर्यटन

धार्मिक स्थळे
महागणपती
tour चिरनेरच्या महागणपतीची मूर्ती तिळातिळाने वाढते अशी भाविकांची श्रदधा आहे . हा गणपती नवसाला पावतो अशी याची ख्याती उरण परिसरात आहे. त्यामुळे या ठिकाणी भक्तगणांची संख्या वाढली आहे. पूर्वी चिरनेर गावातील लोक न्यायनिवाडाकरण्यासाठी गणपतीला कौल लावयचे. माघी गनेशुत्सव व संकष्ट चतुर्थीला गणेशमूर्तीला सजवण्यात येते. तिला चांदीचा मुकूट चढविण्यात येतो. उरण- चिरनेर या महागणपतीने स्वातंत्र्य लढयात सहभाग घेऊन त्याचे चटके सोसले आहेत. त्यामुळे चिरनेर महागणपतीच्या मंदिराची गणना भारताच्या ऐतिहासिक मंदिरामध्ये होते. उरण तालुक्यात मौजे चिरनेर येथिल स्वयंभू महागणपती मंदिर प्रसिध्द आहे. दरमहासंकष्टी चतुर्थीला येथे मोठया प्रमाणात भाविक येतात.
रत्नेश्वरी मंदिर
tour उरण तालुक्यातील रत्नेश्वरीचे मंदिर हे रत्नेश्वरी देवीचे जागृत देवस्थान आहे. सदरचे मंदिर हे उरण तालुक्यातील जसखार या गावामध्ये उरण शहरापासून मुख्यत्वेकरुन 2 किमी अंतरावर स्थित आहे. या मंदिरामध्ये दरवर्षी चैत्रकलाष्टमीला देवीची यात्रा भरविण्यात येते. सदर यात्रेस रायगड जिल्हयातून तसेच कोंकणामधून जवळपास 20 ते 30 हजार भाविकभक्त यात्रेच्या दिवशी रत्नेश्वरी मातेच्या पवित्रदर्शनाचा लाभ घेतात. सदर मंदिराचे सुबकरीत्या सुशोभिकरण करण्यात आलेले असून रत्नेश्वरी मातेचे मंदिर हे उरण तालुक्याचे आकर्षणाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
पर्यटन स्थळे
घारापुरी लेणी
tour मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून 10 किमी अंतरावर भर समुद्रात असलेल्या घारापुरी बेआवरील या लेण्या म्हण्जे अजोड शिल्पकलेचा नमुना होय. म्हणूनच या लेण्या जगप्रसिदध आहेत. गेट वे ऑफ इंडियापासून तसेच उरण तालुक्यातील मोरा बंदरावरुन बोटीने या जगप्रसिदध पर्यटन स्थळावर जाता येते. सदरच्या लेण्या या घारापुरी बेटावर वसलेल्या आहेत. सदर लेण्यांचा जगप्रसिद्रध UNESCO या संघटनेने आंतरराष्ट्रीय वारस स्थळांच्या यादीमध्ये समावेश केलेला असल्याने सदर बेटास जगभरातून तसेच भारतातूनही मोठया प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. घारापुरी बेटावर विस्तृत अशा एकूण 09 लेण्या आहेत. सदर बेटावर गुंफा असून त्याठिकाणी त्रिमुखि शंकराची सुंदर मुर्ती असून नटराज मुर्ती व शिव कथेवर आधारित लेणी अस्तित्वात आहेत. घारापुरी येथील शिवमंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्रीस मोठया प्रमाणात भक्तगण भेट देतात. घारापुरीचा परिसर निसर्गरम्य असून सहलीसाठी उत्तम आहे. सदर परिसरात महाराष्ट्र् पर्यटन विकास महामंडळातर्फे संगीत नृत्य महोत्सव साजरा करण्यात येतो.
द्रोणागिरी किल्ला
tour द्रोणागिरी किल्ला हा उरण तालुक्यामधील चाणजेगावालगत वसलेला आहे. सदर डोंगर भागावार मोठया प्रमाणात जैवविवीधता आढळून येते. तसेच सदरचे ठिकाण हे गिर्यारोहकांचे पसंतीचे ठिकाण आहे. द्रोणागिरी किल्ला हा घनदाट वनराईने आच्छादलेला आहे. सदरचा किल्ला हा पूर्वीच्या काळामध्ये यादवांच्या अंमलाखाली होता, त्याबाबतचे पुरावे सदर किल्ल्यावर आजरोजीही अस्तित्वात आहेत. सन 1530 साली सदर किल्ला पोर्तगीजांनी ताब्यात घेतला होता. सदर किल्लयावरुन संपूर्ण उरण तालुक्याची पहाणी पर्यटकांस करता येते. या किल्याच्या जवळच ओएनजीसीचा गॅस प्लांट असून त्यांचे नजरावलोकन करता येते. उरण येथील बसडेपोपासून डाऊननगर परिसरातील आदीवासी भागातून पुढे या किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे.
हुतात्मा स्मारक
tour शांततेच्या मार्गाने जंगल सत्याग्रह करणा-या आदोलकांवर जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात उरण परिसरातील सत्याग्रहींमार्फत मौजे चिरनेर येथे 30 सप्टेंबर 1930 रोजी चिरनेर जंगल सत्याग्रह झाला. शांततामयरीतीने सुरु असलेल्या या सत्याग्रहात सुमारे सहा हजार आंदोलक सहभागी झाले होते. त्यावेळी इंग्रज सरकारने केलेल्या गोळीबारामध्ये 12 हुतात्मे झाले आहेत. त्यामुळे 25 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. हा सत्याग्रह म्हणजे महाराष्ट्रातील 1930-31 च्या स्वातंत्र्य लढयातील एक महात्वाचे अपाख्यान मानले जाते. सदर गोळीबारात हुतात्मा झालेल्या आंदोलकांमध्ये धाकू गवत्या फोफेरकर, नवश्या महादेव कातकरी, रामा बामा कोळी, हसुराम बुधाजी घरत, रघुनाथ मोरेश्वर न्हावी, परशुराम रामा पाटील, आनंदा माया पाटील, आलू बेमटया म्हात्रे या वीरहुतात्मयांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्याने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मौजे चिरनेर येथे या हुतात्म्यांची स्मारके बांधलेली आहेत व त्यांचे एकत्रित नितांत सुंदर स्मारक चिरनेर गावामध्ये ज्या ठिकाणी गोळीबार झाला आहे त्या ठिकाणी उभारले आहे.