पर्यटन

धार्मिक स्थळे
काळभैरवनाथ देवस्थान
tour काळभैरवनाथ देवस्थान
पर्यटन स्थळे
नरवीर तानाजी (उमरठ) मालुसरे यांची समाधी
tour नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव उमरठ,तानाजींचे धाकटे बंधू सूर्याजी हे दोघेही शिवाजी महाराजांचे विश्वासू लढवय्ये,तानाजीनी आपला मुलगा रायबा याचे लग्न मागे ठेवून कोंढाणा जिंकला पण शिवरायांचा एक लढवय्या शिलेदार धारातीर्थी पडला.तानाजी मालुसरे १४ एप्रिल १६७० रोजी सिंहगडावर उदयभान राठोड बरोबरीचे लढाईत कामी आले.शिवाजीराजांना ही बातमी कळल्यानंतर गड आला पण सिंह गेला हे उदगार त्याच वेळी काढले.तानाजी मालुसरे व शेलारमामांची समाधी या गावी आहेत.
मोरझोत धबधबा
tour पोलादपूर तालुक्यातील चांदके गावाचे हद्दीत मोरझोत धबधबा आहे.पावसाळ्यात हिरवा शालू असलेल्या परिसराच्या पर्श्वभूमीवर पडणारे पाणी मोराच्या पिसाऱ्यासारखे उसळी घेऊन विसावते.धबधब्याजवळून चांदके गावाकडे जाणारा रस्ता आहे.पावसाळ्यात पाणी रस्त्याचे पलिकडे पडते व गावाकडे जाणारी गाडी या पाण्याच्या नैसर्गिक बोगद्यातून जाते.पावसाचे पाणी मोराच्या पिसाऱ्यासारखे दिसते म्हणून यास मोरझेत धबधबा म्हणतात. मोरझोत हा वनश्रीने नटलेला परिसर आहे.वनांत आंबा,फणस सारख्या फळझाडांव्यतिरिक्त वड,उंबर व इतर औषधी वनस्पती आहेत.या जंगलात मोर आहेत.
झुलता पूल
tour पोलादपूर तालुक्यातील बोरावळे गावालगत वाहणारे सावित्री नदीवर बोरावळे वाकण या गावांना जोडणारा पूल हा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पूल असून कोणत्याही आधाराशिवाय असलेला वायररोपचा पुल आहे.वाहतुकीची अडचण व पैशाची चणचण यातून तत्कालीन पंचायत समिती सभापती कै.कोंडीराम मास्तर यांचे कल्पनेतून साकार झालेला आहे. पावसाळ्यातील नदीचे पाण्याचा अवखळपणा व पुलाची वैशिष्टपूर्ण बांधणी पाहणेसाठी फार मोठ्या प्रमाणावर प्रवासी या ठिकाणास भेट देतात. झुलत्या पुलाजवळ महाड,वाकण,कोंडीत जशा प्रकारचे मासे आढळतात तशाच प्रकारचे मासे इथेही पाहणेस मिळतात. जवळ असलेला धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.
चंद्रगड
tour ढवळे गावापासून या गडाकडे जाण्यासाठी दोन ते अडीच तास चढाची निमुळती वाट असून अत्यंत अवघड असा गड. गडावर जाण्यासाठी खोबणीच्या पायऱ्या असून दुसऱ्या बाजून ढवळे घाटाने महाबळेश्वर ( ऑर्थर सीट ) जाता येते.ढवळ्याच्या पूर्वेस वाई तालुक्यातील जोर गावाची हद्द आहे.गडाच्या वाटेवर जननीचे देऊळ आहे.गडावर ढवळेश्वराचे मंदिर आहे.७-८ पाण्याचे टाके आहे.१६५६ मध्ये चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव केल्यानंतर गड महाराजांच्या ताब्यात आला.पुढे १० नोव्हेंबर १६५९ अफझलखान भेटीचे वेळी महाराजांनी राखीव मावळे चंद्रगडवर ठेवले होते.या गडाचा वापर मुख्यत्वे टेहाळणी नाका म्हणून होत होता. ढवळा घाट हा इतिहास प्रसिद्ध घाट असून घाटात कारवीचे जंगल आहे.ढवळे ते जेर हे अंतर अंदाजे दोन ते अडीच कोस आहे.
महीपत गड
tour पोलादपूर दक्षिणेस पैठण व कोतवाल या गावांचे जवळ असलेला गड.किल्याचा सपाट माथा जवळपास १० एकरचा आहे. चहोबाजूने तटबंदी असलेल्या व सर करण्यास अत्यंत सोपा असा हा गड.आजूबाजूचे परिसरातील वसुली कामासाठी वापरणेत येत होता. या गडास पाच दरवाजे असून गडावर पारेश्वराचे तसेच गणपती व मारुतीची पडकी देवालये आहेत.गडावर पडके वाडे, घोड्याची पागा,व इतर उध्वस्थ इमारतीचे अवशेष दिसतात.गडावर भरपूर जंगल आहे.देवळाच्या परिसरात दोन पाण्याच्या टाक्या आहेत.गडावर पडक्या वाडयांचे अवशेष आहेत.गडाच्या ईशान्येला प्रतापगड व मकरंदगड,दक्षिणेला सुरगड व रसाळगड तसेच पश्चिमेस सह्याद्रीच्या रांगा आहेत.परिसर नयनरम्य आहे.शिवरायांनी समर्थाची सज्जनगड किंवा महिपतगडावर राहणेची कायम स्वरूपी व्यवस्था करावी असा पत्रव्यवहार गडाचे रखवालदार रघुनाथ मोरे यांना केला आहे.आजूबाजूचा परिसराचा अभयारण्याचा विकास होवू शकेल.