• Slide
  • Slide
  • Slide

पनवेल तालुका


सुस्वागतम्

      पनवेल हे भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील, रायगड जिल्ह्यातील, पनवेल तालुक्यातील एक नगरपालिका असलेले शहर आहे. पनवेलला कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर नवी मुंबईला लागून आहे. मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे गतिमार्ग येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून २१ कि.मी. अंतरावर आहे.

      रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे. पनवेल गाढी नदीवर वसले आहे. ही नदी पुढे जाऊन पनवेलची खाडी बनते. पनवेल समुद्रसपाटीपासून १२.१७५ मीटर उंचीवर वसलेले आहे. पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुने आहे. या काळात मोगल, इंग्रज, पोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्राची सर्वात पहिली नगरपालिका आहे. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू करण्यात आल्या. समुद्रमार्गे व खुश्कीच्या व्यापारामुळे पनवेल वाढत व प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत.

      पनवेल हे पनवेल शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गांवर आहे. कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या पनवेल मध्ये थांबतात. मुंबई - पुणे प्रगती एक्सप्रेस देखील पनवेलवरून धावते.

Tahasildar