पर्यटन

धार्मिक स्थळे
ग्रामदैवत श्री धाविर देव, म्हसळा
tour श्री देव धावीर हे म्हसळयाचे ग्रामदैवत असून त्याची चैत्र पौर्णिमेस जत्रा भरते. सर्व जाती-जमातीत बंधुभाव वाढण्यासाठी, गावात शांतता व सुबत्ता राखण्यासाठी श्री धावीर देव यात्रेचे आयोजन करण्याची अनेक वर्षांपासून परंपरा आहे.
घुमेश्वर देव, घुम
tour म्हसळ्यापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर घुम गावामध्ये घुमेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे बारमाही पाण्याचा ओहोळ व संपूर्ण परिसर वनराईने नटलेला आहे. घुमेश्वराचा नितांत सुंदर परिसर हा पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिध्द आहे.
पर्यटन स्थळे
देहेन परिसर-नयनरम्य धबधबा
tour म्हसळ्यापासून 10 कि.मी. अंतरावर देहेन हे वैविध्य पूर्ण वनश्रीने नटलेले नैसर्गिक झ-यांचे वरदान लाभलेले ठिकाण असून येथील धबधब्याला बारमाही पाणी असते.
चिरगाव (बागाची वाडी)
tour चिरगाव (बागाची वाडी) हे गिधाडांचे नैसर्गिक वस्तीस्थान आहे. ये‍थील गिधाडे पांढ-या पाठीची व लांब चोचीची आहेत.