पर्यटन

धार्मिक स्थळे
महड
tour खालापूर तालुक्यातील मौजे महड येथे अष्टविनायक श्री. वरदविनायक गणपतीचे तिर्थक्षेत्र प्रसिध्द आहे. महड हे खालापूर-खोपोली मार्गावर आहे.
गगनगिरी महाराज आश्रम खोपोली
tour मौजे खोपोली येथे हा गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. येथे गगनगीरी महारांजाची समाधी आहे. निसर्गरम्य परिसर असून येथे एक आध्यात्मिक स्थान म्हणून प्रसिध्द आहे.
पर्यटन स्थळे
ॲडलॅब इमॅजिका मनोरंजन पार्क
tour खालापूर तालुक्यात मौजे सांगडेवाडी येथे आहे. येथे मनोरंजन पार्क पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन लहान-मोठे सर्वच लोक येतात. या मनोरंजन पार्कमुळे खालापूर तालुका भारताच्या नकाशात प्रसिध्द झाला आहे. तसेच त्यामुळे या तालुक्याला एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे.
tour
tour
tour
tour
tour
मोरबे धरण
tour मौजे चौक येथे मोरबे धरण असून येथून नवी मुंबईसाठी पाणी पुरवठा केला जातो.
उंबरखिंड
tour उंबरखिंड, शिवाजी महाराज काळातील स्मारक चावणी – 02 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतलब खान, स्त्रीत सरदार रायबागन व तीस हजार फौजेचा उंबरखिंड या ठिकाणी पराभव केला. खान कोकण काबीज करण्या्साठी आंबेनाळ उंबरखिंड मार्गे उतरणार हे महाराजांना समजताच स्वराज्यााचे सरसेनापती नेताजी पालकरांना पुढे जाऊन छावणी टाकण्यास सांगितले. स्वराज्याचे सैन्य उंबरखिंडीच्याा मार्गात दबा धरुन बसले होते. खानाचे सैन्य. खिंडीत उतरते ना उतरते तोच छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्याा सैन्यावर हल्ला चढविला. एका बाजूने नेताजी पालकर दुस-या बाजुने स्वतः शिवाजी महाराज असे कोंडीत पकडून अचानक झालेल्या हल्यामुळे खानाच्या सैन्याची दाणादाण उडाली. खानास माघार घ्यावी लागली. या लढाईचे वैशिष्टे असे की, कमी सैन्याने प्रचंड शत्रुचा गनिमीकाव्यााने पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः एकूण 27 महत्वपूर्ण लढायामध्ये. भाग घेतला होता. त्यापैकी ही एक लढाई आहे.
एन. डी. स्टुडीओ
tour खालापूर तालुक्यातील मौजे हातनोली येथे एन. डी. स्टुडीओ असून येथे वेगवेगळया चित्रपटाचे, मालीकांचे शुटींग केले जाते.
झेनिथ धबधबा
tour खालापूर तालुक्यातील मौजे खोपोली येथील निसर्गरम्य झेनिथ धबधबा प्रसिध्द आहे. हा धबधबा पावसाळयात पाहण्यासारखा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी राज्यातून वेगवेगळया ठिकाणाहून येथे पर्यटक भेट देत असतात.